मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भजन : भाग ६|
ओझर क्षेत्री नांदे विघ्नर...

भजन - ओझर क्षेत्री नांदे विघ्नर...

भजन - A bhajan or kirtan is a Hindu devotional song, often of ancient origin. Great importance is attributed to the singing of bhajans with Bhakti, i.e. loving devotion. "Rasanam Lakshanam Bhajanam" means the act by which we feel more closer to our inner self or God, is a bhajan. Acts which are done for the God is called bhajan.

ओझर क्षेत्री नांदे विघ्नराज । कैसा झाला त्याचा अवतार । येथे होते दंडकारण्य जेथे पार्श्‍वऋषी तप करी ॥१॥

दंडकारण्य कुकडी गंगेसी दक्षिणेहूनी उत्तरेसी वाहात आली या दिशेसी । पुढे पूर्व भागी असे ॥२॥

दक्षिणेसी ओघ जेथे झाला । पार्श्‍वऋषी तपाला बैसला । तप करीता फार शिणला । व्याकूळ झाला अंतरी ॥३॥

पार्श्‍वाची भार्या रुपवंती । नामे दीपवत्सला सती । गणेशमूर्ती पुजीताती । एकाग्र मन करुनीया ॥४॥

ऋषीला साक्षात्कार होऊनी गणेश पुढे उभे राहुनी । मस्तकावरी हात ठेवूनी । इच्छा काय भक्तवर्या ॥५॥

ऋषी म्हणे देवाधीदेवा । कुमार तू माझा व्हावा । तुझी सेवा आम्ही करावी । अशी माझी इच्छा आहे ॥६॥

इतके ऐकून गजानन । मी तूझा कुमार होईल । अक्षय तुझी सेवा होईल । कोड पुरविल माझे का ॥७॥

पुढे ऋषीचा कुमार होवूनी उभयतांचे मन रंजूनी क्रिडा करील आनंदानी । संतोषविले ऋषीते ॥८॥

इकडे संकट पडले शिवासी शिव गेले स्वानंदपुरीशी गणेश विचारीती प्रश्‍नाशी । कसे आला तुम्ही येथे ॥९॥

शंकर म्हणे देवाधी देवा फार गांजीले आसुर आम्हा । काहीतरी उपाय करावा असे बोलूनी विभूने ॥१०॥

गणेश सिंहासनी बैसले उठूनी शिवासी सामोर आले । शिव भवानीचे स्वागत केले कुशल प्रश्‍न विचारी ॥११॥

असुरांनी छळीले आम्हासी काही देणगी द्या मजसी । म्हणूनी आलो तुजपाशी सांग सांग गणराया ॥१२॥

गजानन बोले शिवासी । मस्तकीच्या दुर्वा देतो तुजसी ऋषी देब मिळूनी पुजीसी । जय पावशी शंकरा ॥१३॥

माझ्या निर्माल्याचा प्रताप अपजय कधीच न होय असे म्हणूनी गजानन शमी दुर्वा दिल्या मस्तकीच्या ॥१४॥

निर्माल्य घेऊनी शंकर दुर्वास ऋषी सहीत सर्व जनांनी पूजा करुन इद्रांनी नाही पूजिल्या ॥१५॥

इंद्रा झाला अभिमानी मी सर्व देवांचा राजा होय मजहून मोठा आहे कोण ऐसा गर्वांने बोलला ॥१६॥

हे गणेशांनी अंतरी समजून त्याचा गर्व मी नाहीसा करील ऐसे गणेश बोलून मनी खिन्न झाले हिमालय आणि विद्याद्री पर्वताच्या मध्यभागी हेमावती नांवाची नगरी । ह्या नगरीचा राजा होता ॥१७॥

अभिंनदन नावाचा राजा राज्य करीत असता अक्षय आनंदात होता प्रजा पाळी प्रितीने ॥१८॥

इंद्रपद मजसी प्रात्प व्हावे म्हणूनी यज्ञ करण्याला सर्व ऋषी सहीत देवाना यज्ञाला बोलाविले ॥१९॥

इंद्रा नाही पाचारिले सर्व देव ऋषी यज्ञाला आले यज्ञकुंड तेथे रचीले । यज्ञ सुरु तेथे झाला ॥२०॥

नारदानी हे पाहुन गेला इंद्र भुवना निघूनी इंद्रा सर्व वर्तमान सांगूनी क्रोध आला इंद्रासी ॥२१॥

इंद्राने केले काळाचे स्मरण काळ स्वरुपाचा नाश सर्व आला तेथे धावून-यज्ञमंडपी तू जाऊन यज्ञाचा विध्वंस करावया ॥२२॥

काळ झाला विघ्नासूर दैत्य पंचमहाभूते रूप घेणार-सर्व जग तुझ्या स्वाधीन इंद्राने असे सांगितले ॥२३॥

हुकूम घेवूनी विघ्नासुर इंद्रासी मुजरा करुनी हे काम वारील म्हणुनी ऎसे वचन त्यासी दिले ॥२४॥

इंद्राच्या हुकुमावरुनी विघ्नासूर गेला यज्ञमंडपी यज्ञाचा विध्वंस करुनी सर्व नाश त्याने केला ॥२५॥

ह्या कर्मभूमीवर सर्व वैदिक कर्माचा लोप होवुन कर्म लोप झाला म्हणून देवाऋषी दिलगीर झाले ॥२६॥

सर्व देवानी गणेश आराधूनी नामघोष यांचा करुनी स्तोत्री जप सर्वांनी करुनी लीन झाले मोठ्या भक्तीने ॥२७॥

हे गणेश अंतरी समजून देवांचा आर्जव ऐकून सर्व देवांचे संकट पाहून विभू काय करीते झाले ॥२८॥

आकाशवाणीने सांगूनी दंडक अरण्य कुकडी गंगेशी दक्षिण दिशेहून उत्तर दिशेसी ओघ जेथे आला ॥२९॥

तेथे पार्श्‍वऋषी तपाला बैसला पार्श्‍वशांची भार्या दीपवत्सला तेथे माझा अवतार झाला यांचा सूत मी असे ॥३०॥

पार्श्‍वाची भार्या सुलक्षण पतीच्या वचनात नेमाने रात्रदिवस माझे ध्यानात, निमग्न सदा असे ॥३१॥

दोघांचे तप पाहूनी-अवतार त्यांच्या घरी घेऊनी, नाव गजानन ठेवूनी, पाळीती मोठ्या भक्तीने ॥३२॥

ह्या बाळासी जाऊनी आणावे, ब्रह्मा विष्णु शिव यांनी, जावे सांगूनी आकाशवाणीने, स्तब्ध झाले सर्व देव ॥३३॥

निघाले त्रिगुण आणावयासी पार्श्‍वऋषीच्या आश्रमासी, प्रेमाने नमस्कार घालीत-स्वागत करीती ऋषीचे ॥३४॥

विघ्नासूराला मारणे आहे, आकाशवाणीने सांगितले, तुझ्या पुत्राच्या हाताने, मृत्यु आहे असुराशी ॥३५॥

हे बालक द्यावे आम्हासी हा मारील असुराशी, याचे हाताने मरण त्यासी, म्हणूनी आलो गुरुवर्या ॥३६॥

पार्श्‍वऋषी सांगे त्रिगुणाला, हा बालक आहे पाच वर्षाचा, हा काय करील संग्रामाला, नाही देणार मी बाळ ॥३७॥

दिव्य वत्सला शोक करीती, बाळ नेऊ नका म्हणती, पार्श्‍वऋषी म्हणे पुष्कळ तपांनी, बाळ आम्हासी मिळाला ॥३८॥

इतके ऐकूनी गजानन, माता पितासी समजावून, ह्याचे कारणे माझा अवतार झाला झाला आहे ऋषीवयी ॥३९॥

पाच वर्षाचे बालक, नेले त्रिगुणाने मागून, हे काय संग्राम करणार, ऐसे जन बोलती ॥४०॥

बाळ नेऊनी त्रिगुण, यज्ञापासी नेले बाळ, पाहिला त्याने विघ्नासूर, असूर अंकुशानी डांभीला ॥४१॥

अंकुशानी धरूनी आसूर, देवाच्या समोर ओढीत आणीला, आसूर मायारुपी प्रगटीला, झाला तेव्हा अग्नीरुपी ॥४३॥

महाभुतांची रूपे धारण-वायू आकाश महाकाळ-अहंकार या विघ्नस्वरुपाचा नाश, सर्व करुनी पहिला ॥४४॥

शेवटी तो शरण येऊनी, साष्टांग दंडवत घालूनी, नम्रतेने विभूसी बोलला तुझी आज्ञा मानील ॥४५॥

शरण येऊनी गजाननाला, आराधीला गजवदनाला, रक्ष रक्ष स्वामी मला सदैव आज्ञा मानील ॥४६॥

आपल्या चरणकमली अक्षय भक्ती असावी गजानन, अखंड नामस्मरण घेईल, माझे नाम धारण करावे ॥४७॥

माझ्या नावी तुमचे नाव व्हावे, विघ्न हे अक्षय पहिले असावे, हर किंवा राज हे मागूनी असावे, हे वरदान मज असावे ॥४८॥

अष्टगणांत मुख्य मी व्हावा, हे मागणे तुम्ही मज द्यावा. विघ्नासुराची जी जी इच्छा ते सर्व दिले विभुते ॥४९॥

मुळचा काळ हा विघ्नासुर, मरण मुळीच नाही या लागून म्हणूनी याला दिले वरदान, विघ्नाचे मरण चुकविले ॥५०॥

विघ्नासी सांगे गजानन, विघ्नराज व विघ्नहर हे मज आजपासुनी नाम, ऐसे विघ्नासी सांगितले ॥५१॥

ह्या नामाचा जप करणार्‍यास, इच्छिले काम त्याचे करील, संकट कधीच नाही येणार, सर्व सिद्धी प्राप्त असे ॥५२॥

महाकाळ विघ्नगण हे तुला नाम मला जे प्रिय तू मुख्य गण होय, माझ्या हुकुमात राहणार, माझ्या भक्तांचे रक्षण करावे ॥५३॥

विघ्न सांगे हे विघ्नराजा काही अक्षय मज असावा, तुझ्या मनासी माझे ध्यान असावा हेच मी मागतो ॥५४॥

विघ्नराज सांगे ऐक रे विघ्ना, कार्य आरंभ झाला असता, माझी पूजा कोणी न करीत असता, मूळ सोडूनी सर्व ॥५५॥

तेथे विघ्न तू जरूर आणावे अभक्तांचा भोग तू भोगावे, माझ्या शास्त्रांची निंदा करणारे, तेथे विघ्न तु आणावा ॥५६॥

नाम असता माझे जेथे, पाखंडी शास्त्रांच्या मताने, माझ्या भक्तांना छळणारे, त्यांचा भोग तू भोगावा ॥५७॥

शिव विष्णु प्रमुख देवासी ऋषीमुनी सर्व मानवासी, अहंकार मुक्त होईल कोणी, यांचा भोग तू भोगावा ॥५८॥

माझे अध्ययन ज्या ठिकाणी श्रोता वक्त्याचे रक्षण करी, तेथे विघ्न तू आणू नये, मी अक्षय तेथे आहे ॥५९॥

माझ्या भक्तास कोणत्याही प्रकरे त्रास देवू नाही । असे आज्ञापूर्वक सांगूनी वरदान देते झाले ॥६०॥

विघ्नहाराने मातापित्याचे समाधान करुनी यांचे, महाकार्याचे वेळी माझे, स्मरण केले त्यावेळी ॥६१॥

मी सदैव सादर होईल, इतके बोलूनी विघ्नराज, मातापित्यांचे चरण वंदूनी अवतार पवित्र संपाविले ॥६२॥

मृदुल ऋषीने द्विपदिपामध्ये आणि खंड खंडामध्ये, जे जे क्षेत्र गणपतीचे, त्यांचे स्थूलमानाने वर्णन ॥६३॥

ह्या मूर्तीची स्थापना करण्याला भाद्रपद शुक्ल चतुर्थीला मध्यानकाली विघ्न राजाला । बैसविला पंचायतानी ॥६४॥

पंचदेवा पुढे प्रगटिला । त्यावेळी तेथे स्थीर झाला । शिवशक्ती विष्णू ब्रह्मा याने विभू शांत केले ॥६५॥

चार दिशेला चार द्वार स्थापन । मानस पुत्राने लक्ष्मीनारायण । विघ्नहाराचा पुर्वद्वार होय हे केल्याने धर्मप्राप्ति ॥६६॥

दक्षिण द्वाराभी मुख उमाशंकर । मानस पुत्राने बैसवून । हे द्वार केल्याने अर्थ मिळेल । विघ्नहर व्यासी सांभाळिती ॥६७॥

पश्‍चिम द्वारासी स्त्री मदन । हे द्वार केल्याने काम मिळेल । हे मानस पुत्राने बैसून । विभु त्यासी कृपा करीती ॥६८॥

उत्तर द्वारासी पृथ्वी सूर्य । हे मानस पुत्राने स्थापन । हे द्वार केल्याने मोक्ष मिळेल विघ्नहर सदैव त्याचे पासी ॥६९॥

पंचदेवाने विभू पार्थिंला । त्यावेळेला तेथे शांत झाला । सर्व देव लागे चरणाला सर्वाना दर्शन दिले ॥७०॥

अष्ट सिद्धीची स्थापना आठ दिशेला दश दिवयाळ दहा दिशेला । शिव विष्णू प्रमुख देवांना त्यावेळी दर्शन दिले ॥७१॥

धर्म अर्थ काम मोक्ष हे द्वार केल्याने मिळेल । प्रभु त्याची इच्छा पूरी करील द्वार याना ऐसी आहे ॥७२॥

पंचायतन प्रमुख देव । काशी प्रमुख सर्व क्षेत्र गंगादी महानद्या सर्व सेवा करण्याला गणेशाची ॥७३॥

रात्री माध्यान्हीला येती सर्व सेवा करुनी जाती सदैव कथा गाणी गाती अक्षय ॥७४॥

जे ह्या क्षेत्रांत राहातील । गणेश भक्त त्यांना म्हणेल । विघ्नराजाच्या कथा जो ऐकेल त्याशी प्रात्पि ऐहिक भोगाची ॥७५॥

विघ्नहर जप जो करील त्याला विघ्नराज दर्शन देईल । चारी मुक्ती त्यासी मिळेल ॥७६॥

पुढे वरेण्य येथे येऊनी विघ्नहराचे तप करुनी विघ्नराजाशी दर्शन देऊनी वरेण्य उद्धरीला ॥७७॥

अकरा अध्याय गीता सांगूनी प्राणसखा केला वरेण्याली विराट स्वरुप दाखवूनी उदरांत ब्रह्मांडे दाविली ॥७८॥

विभूनी गुप्त योग सांगूनी मनांतला कल्प दुर करुनी । एक रुप गणेश जाणूनी भक्ती मार्ग दाविला ॥७९॥

शिवश्क्ती विष्णू सूर्य आणि पांचवा हा गजानन । या पाचांत अभेदन मानून पंचदेव एक आहो ॥८०॥

ऐसा गणेशा पूजनानी पूजा घडेल पंचयतनाची म्हणूनी अक्षयी हृदयी ठेवा तुम्ही विघ्नराजा ॥८१॥

मुळ ॐकार विघ्नराज यांचे पासूनी पांच देव ब्रह्मा विष्णू शिव शक्ती सूर्य पंचदेव पितावेद बोले ॥८२॥

ऐसा योग वरेण्यासी सांगूनी हा गुप्त ठेव ऐसे बोलूनी सांगू नको अभक्तासी वरेण्यासी ऐसे बोलिले ॥८३॥

वरेण्यासी वैराग्य होवूनी अवघ्या प्रपंच्याचा विर मानूनी राज्य सोडूनी वनाप्रती तप करण्यासाठी गेला ॥८४॥

अरण्यात तप करुनी विघ्नराज चरणी लीन होवूनी देहासहीत उद्धरूनी अंती सुख पावला ॥८५॥

विघ्नसुराचा कारण अवतार झाला विघ्नराज । विघ्नसुराशी अकलून विघ्नगण केला याशी ॥८६॥

इंद्राच्या हुकुमावरुन काळ झाला विघ्नसूर । पार्श्‍व ऋषीचा झाला नंदन आसुराच्या कारणे ॥८७॥

मूळचा काळ झाला आसूर याला मरण नव्हते मुळीच हा सर्व देवाना धळीत तेव्हां विघ्नराज प्रगटला ॥८८॥

ओझर क्षेत्रांत विघ्नराज प्रगट झाला सर्वेश्‍वर भक्ताची संकटे केली दूरे समूळ विघ्ने वारूनी ॥८९॥

ह्या अष्टस्थानांत सातवे स्थान ओझर क्षेत्रांत विघ्नराज कुकडी गंगा आहे पवित्र दोष जाती दर्शन करता ॥९०॥

N/A

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP