सांगते कुंती कृष्णाला कर्ण तो पांडव रे पहिला ॥धृ॥
नवमास मी जपला उदरी परी न घेतला आडवा पदरी नाही कधी मायेने चुंबिला ॥१॥
करुनी फुलाची परडी शामा बाळा धाडिला मी निजधामा । रुदन ध्वनी त्याचा न ऐकिला ॥२॥
कुंवारपणाचे आईपण जल देवीना केले अर्पण । जळामध्ये मी बाळ सोडीला ॥३॥
कौरव पांडव करीत तांडव । युद्धाचे ते पेटले गाव । वाहिले ते रक्त धरणीला ॥४॥
माया माझी वेडी झाली । तुझ्यासवे गोष्ट नाही फुटली । सांगू नको तू धर्माला ॥५॥