आले कैलासीचे नाथ मुखी राम राम गात ॥धृ॥
रामनामाचे जप याने केले । म्हणूनी विष ते पचविले । नीलकंठ हो नीलकंठ नाव त्यासी देत ओ मुखी रामराम गावे ॥१॥
भस्मासुरासी वर यानी दिला तो पाठीमागे लागला । भक्तासाठी हो भक्तासाठी मोहीनी देव देत हो ॥२॥
तुमच्या नामाचा महिमा किती झाला सांगितले भागवत पार्वतीला तेव्हा पासुन शुक सांगती जगतात ॥३॥
रामनामाचा छंद लागो आम्हा । तुम्ही न्याल आम्हा निजधामा । म्हणूनी रुक्मीणी ओ रुक्मीणी शरण तुम्हा येत ओ रुक्मीणी ॥४॥