नैवेद्य अर्पुणी आरती केली दुत उभा समोर । ज्ञानवृत्ती पाहूनी त्याची गेला यमाजवळ ।
दुत सांगती यमालागी धीर नाही आमुचा शिव हातावरी स्थापन केले त्याला मी आणू कसा ।
हरहर शंकरा यावे लवकरी फासा घातीला गळा । यावे लौकरी सांबारे तू जीव झाला घाबरा ॥धृ॥
वहाना वरती बसूनी निघाली यमराजाची स्वारी । हाती घेऊनी शनी फासा गेला मार्कंडेच्या मंदिरी ।
दुरबुद्धीने फासा घातीला मार्कंडेच्या गळा । ध्यान लावूनी बसला होता उघडूनी पहातो डोळा ॥१॥
इतके ऐकूनी पिंडीतूनी प्रगटले हरीहर । त्रिशुल ओढूनी चाप लावीला मस्तकी ठेविला कर ।
मार्कंडेच्या दुदैवाने भोगच ओढविला । आयुष्य त्याचे बळकट असता कसा रे नेतो त्याला ॥२॥
दुत सांगती यमा लागी हुकूम कोणी केला । आयुष्य त्याचे बळकट असता कस रे नेतो त्याला ।
हरहर शंकरा यावे - लवकरी फासा घातीला गळा ॥३॥