तुम्ही चला चलागे चला सकल शिव पुजनी ध्या पुजापात्र करी भरुनी तुम्ही चला ॥धृ॥
उदसत्वाचे उदक आणोनी, मन अमृत हे पुजन करोनी, भावे बेल त्यासी अर्पूनी पुष्प घ्या सुमनी ॥१॥
षडविकार वळल्यावाती अहं ब्रह्मा घालूनी वरती ज्ञानाची लावूनी ज्योती ऐसा ओवाळूनी शुळपाणी ॥२॥
ऐसी केली षोडस पूजा मनोभावे पुजीला सांबराया यावरी रमेती गिरीजा वरमागू पूजीला नमूनी ॥३॥