जिथे तिथे अडविसी जिला तिला रे । आम्हा काय घरी दिला हरि रे । किती तेज तुझ्या मुरलीला हरि रे ॥ या करणीला तुझे नाम मी कुणाकडे म्हणशील चला चला रे ॥धृ॥
अधिकार तुला कोणी दिला हरि रे । हा मार्ग चांगला नव्हे हरि रे । मी सांगेल यशोदेला हरि रे ॥१॥
उभी होते यमुना तिरी । विटी दांडू चेंडू लवकरी हरि या चेंडू दांडू लवकरी । घागर भरता धरि पदरासी कुणीकडे म्हणसील चला चला रे ॥२॥
चंद्रावलीच्या हरि ओ । देव झाले जग जेठी हरि ओ देव । मी चंद्रावली तशी नव्हे रे कुणीकडे म्हणसील चला ॥४॥