आला कैलासीचा नाथ डोळे भरुनी पाहा त्यास ॥धृ॥
शिरी गंगा झुळझुळ वाहे चंद्राची कोर झळकत आहे । डमरु त्रिशुल शोभे यास ॥१॥
राजारावण भक्त झाला मस्तक त्याने अर्पिले शिवाला प्रसन्न होऊनी उमाकांत दिव्य लिंग दिले त्यास ॥२॥
मार कुब्जाराणी महान भक्त पूजिले त्याने शिव लिंगास यमापासूनी मुक्त केले त्यास ॥३॥
सौदागर रूप धरूनी महानंदेचे सत्व पाहूनी उद्धारुनी नेले तीस ॥४॥
तुमची लीला अपरंपार शिणूनी गेले वेद चार शांता भजे शिवचरणास ॥५॥