मनी नाही भाव देवा मला पाव अशाने पावत नाही हो देव बाजारचा भाजीपाला नाही हो ॥धृ॥
एक सोनीयाचा देव त्याला चोराचा भेव, दुष्काळात मोडून खाय ओ ॥१॥
एक लाकडाचा देव त्याला सुताराचा भेव, अग्नीत जळून जाय ओ ॥२॥
एक मातीचा देव त्याला कुंभाराचा भेव, पाण्यात विरघळून जाय ओ ॥३॥
एक दगडाचा देव त्याला वडार्याचा भेव , सेंदुरात लिपून जाय ओ ॥४॥