मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
प्रतीप

अर्थालंकार - प्रतीप

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


अनुष्टुप्‍ -
प्रतीपउपमानाचें । उपमेयत्व कल्पिणें ॥
त्वच्चक्षु - तुल्यकमल । त्वन्मुखासारिखा शशी ॥१॥

गद्य -
जें खरोखर उपमान असावयाचें त्यास उपमेय मानणें, व उपमेय असावयाचें त्यास उपमान मानणें, या अलंकारास प्रतीप असें
ह्णणतात. जसें कमलासारखे डोळे व चंद्रासारखें मुख असें ह्णणणें वास्तविक असतां डोळ्यासारखें कमल व मुखासारिखा शशी असें
ह्णणणें. याप्रमाणेंच खालींही.

श्लोक -
जें तुझ्या नयनतुल्य जहालें ॥
तें जली कमल सर्व बुडालें ॥
जो प्रिये वदन-कांत्य-नुकारी ॥
त्या विधूसहि बलाहक वारी ॥२॥
जो तुझ्या अनुसरी गमनाला ॥
हंस-संघहि तसाचि दुराला ॥
यापरी सदृश वस्तु विनोदें ॥
दु:ख्रर्‍यापन न दैव करुं दे ॥३॥
दिनकर-किरणांनीं जें प्रभातीं विकासें ॥
वरतनु-मुखसें तें कांतिमत्पद्म भासे ॥
कुमुदहि मिटतें कीं तेंवि चंद्रास्त होतां ॥
हसित सम बंधुचें कांत देशास जातां ॥४॥

विशेष लक्षणें.
(अ)
आर्या -
अन्योपमेयलाभें वर्ण्याचाहो अनादर तरी तो ॥
गर्वपुरे हा वदना कांतीनें चंद्र तुजसमचि दिसतो ॥५॥

यांत वर्णन करण्या पात्र झालेलें जें वदन त्याचा अनादर केला आहे; आणि अवर्ण्य असा जो चंद्र तो उपमान असतां उपमेय असा
मानिल्यामुळें त्या अनादरास कारण झाला आहे. याप्रमाणेंच. -

अपरिमितगर्व भद्रे नेत्रां विषयीं उगचिहि वहाशी ॥
जिकडे तिकडे दिसते सरोवरीं नीलकमल-तति ऐशी ॥६॥
(आ)
वर्ण्योपमयलाभें तुज गर्व किती बायका तुझ्या समच ॥७॥

येथें बायकांचे वर्णन करणें प्रस्तुत आहे, व कालाचें अप्रस्तुत ह्णणजे अवर्ण्य आहे, आणि उपमेय बायका मिळाल्यामुळें उपमान जो काल  त्याचा अनादर केला आहे. याप्रमाणेंच. -

अतितीव्र वस्तुमध्यें हलाहला श्रेठ मीच हा टाकी ॥
गर्वतुझा ह्या लोकीं दुर्जन-वच तुजसमान असतीं कीं ॥८॥
(इ)
वर्ण्योपमा अवर्ण्यी साजेना अर्थ हा जिथें असतो ॥
खोटी उक्ति सखे ही त्वन्मुखसमकांतिमान्‍ शशी दिसतो ॥९॥

येथें अप्रस्तुत जो शशी त्याला प्रस्तुत जें मुख-वर्णन त्याची उपमा जत नाहीं. असें सुचविलें आहे. याप्रमाणेंच. -
सरसिज-पत्राक्षि तुवां हें माझें बोलणें श्रवण कीजे ॥
तो मृगलांछन तुझिये वदनापरि बोलतात पामर जे ॥१०॥
(ई)
उपमानाचें जेव्हां नसे प्रयोजन जरी सुचवी ॥
दिसल्या वदन तियेचें पद्मेंदू-दर्शनें कशास हवी ॥११॥

येथें तुझें मुख दिसल्यास कमल व चंद्र यांचें प्रयोजन नाहीं, असें सुचविलें आहे. याप्रमाणेंच. -
श्लोक - ब्रह्मा देखे तद्यशा जैं प्रतापा ॥
धि:कारी तैं कौमुदी-सूर्य-तापा ॥
सूर्येंदूचे मंडलांचे मिषानें ॥
वैय्यर्थ्यातें दाविलें कीं विधीनें ॥१२॥

येथें कीर्ति व प्रताप हीं दोन पृथ्वीवर असतां चंद्र व सूर्य यांचें प्रयोजन नाहीं, हें सुचविले आहे.
गद्य-कित्येक ग्रंथकार शेवटील प्रतीपास आक्षेपालंकार असें ह्नणतात.

दुसरीं उदाहरणें.
श्लोक - जरी मुख कशास सोम, जरि नेत्र हे पाहिले ॥
कशास कमलें, जरी भ्रुकुटि-चाप हें देखिलें ॥
अनंग-धनु कासया, जरिहि कुंतलें कासया ॥
पयोदपटलें जरी सुतनु ही रमा कासया ॥१३॥
घनाक्षरी-स्वच्छत्वच्छीलसें अर्ण । पद्म त्वदानन-वर्ण ॥
पिक तापवाया कर्ण । पंचम विष वमे ॥१४॥
घनाक्षरी रामायण.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP