मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
सहोक्ति

अर्थालंकार - सहोक्ति

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


अनुष्टुप्-
चमत्कृति उपजवी साहित्य तरि त्या म्हणा ॥
सहोक्ति, याचकासंगें गेली कीर्ति दिगंतरा ॥१॥
श्लोक-छाया बैसतसे तरुतळवटीं पांथाचिये संगतीं ॥
मत्स्यांशींसह डोहनीर जडता जातेंच मूलाप्रती ॥
लोकांशीसह तप्त सूर्यहि तसा पीतो जलातें करीं ॥
निद्रा स्त्रीजनसंगती शिरतसे अंतर्गृहाभीतरीं ॥२॥
आर्या-पुजन करुनी आज्ञा आशीर्वादासमेत दे सुमुनी ॥
तत्तापासह राघव गेला तेथून तत्पदें नमूनी ॥३॥
मंत्ररामायण.

गद्य-
हा अलंकार सह किंवा त्या अर्थाचा दुसरा शब्द लाविल्यावांचूनही होतो असें साहित्य दर्पणकाराचें मत आहे.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP