अर्थालंकार - समाधि
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
श्लोक-
दुजे कारणाचेनि योगें जरी हो ।
बहू कार्य सोपें समाधी ह्णणा हो ॥
उतावीळ हो नायिका जावयाला ।
रवी-अस्तही त्याच काळीं जहाला ॥१॥
हिचा मान मी घालवाया निघालों ।
पदीं लागण्या जेधवां सिद्ध झालों ॥
अकस्मात तों दैव माझें उदेलें ।
घनाचें सुरुं गर्जणें तैं जहालें ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP