अर्थालंकार - मालादीपक
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
अनुष्टुप्-
दीपकैकावली योगें मालादीपक होतसे ॥
स्मरें चित्तीं तिच्या चित्तें वास केला तुझ्यांत कीं ॥१॥
गद्य-
यामध्यें पूर्व वाक्यांची उत्तरोत्तर वाक्यांशी सांखळी लाविली आहे, आणि सर्वांचे दीपक असें क्रियावाचक पद एकच आहे.
श्लोक-
येऊनी रणभूमिकेस धनुषा आरोपिता मार्गण ॥
जें जें प्राप्त जयास होय सहसा ऐका नृपा आपण ॥
चापाला शर, शत्रूचें शिर शरां, शीर्षांस विश्वंभरा ॥
भूला पालक तूं, तुला यश, यशा त्रैलोक्य, राजेश्वरा ॥२॥
आर्या-हा शुक्लपक्ष शशिची करि वृद्धी चंद्र कुसुमबाणांची ॥
मदनहि अनुरागाची अनुरागहि तरूण-सुरतवांछेची ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP