मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
अवज्ञा

अर्थालंकार - अवज्ञा

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


एकाचे गुण अथवा दोषांनी अन्य वस्तुला जेव्हां ॥
गुणदोष न येताती तीस अवज्ञा असें ह्णणा तेव्हां ॥१॥
जरि सागरांगुन निघें प्रस्थ तरी थोडकेंच जल घेतें ॥
मिटलीं जरी सरसिजें चंद्राची हानि कोणती होते ॥२॥
श्लोक-सुधातुल्या उक्ती जरि बुधजनां तुष्ट करिते ।
न हो कांहीं हानी जरि अरसिकांला न रुचते ॥
नरारोहा जैसी तरुण पुरुषा जी रमविते ।
कुमारांचे हो ती नच कधिंहि चित्तास हरिते ॥३॥
होसी स्वार वृषावरीच लघुतादिग्दंतिची कोणती ।
नागां बांधुन हस्तकीं मिरविसी सौवर्ण हानी न ती ॥
शंभो ठेविशि मस्तकीं हिमकरा तें काय सूर्या उणें ।
आहेसी जगदीश हेंच तुजला दूजें नसे बोलणें ॥४॥
हंसातें हासिलें ही तरि गुणयश तें नाशिलें काय काकीं ।
त्यांचे अज्ञान तें हें विदित परि रुचे कोपसन्नायका कीं ॥
सद्धर्म कारूण्यसिंधू जन म्हणुनि असा या करें लक्ष मेला ॥५॥
बृहद्दशम.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP