अर्थालंकार - मीलित
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
श्लोक-
साम्यामुळें भेद दिसे जेव्हां । अलंकृती मीलित होय तेव्हां ॥
आधींच आरक्त पदें प्रियेचीं । लक्षारसाची मग दीप्ति कैची ॥१॥
पुष्पें स्त्रिया घालुनि मालतीचीं । अंगी उटी आर्द्रहि चंदनाची ॥
क्षौमांशुका नेसुन चांदण्यांत । कांतार्थ जातात न दीसतात ॥२॥
गद्य-
यांत स्त्रियेचीं पाउलें आरक्त असल्यामुळें वर लाक्षारस लाविला आहे कीं काय, अशाविषयीं मुळींच शंका आली नाहीं. वस्तुत:
लाक्षारस लाविला होता. अभिसारिका चांदण्यांत संकेतस्थळीं जात असतां सर्व शुभ्र शृंगार केला असल्यामुळें ती चालते आहे, असें
मुळीच समजलें नाहीं. साहित्य दर्पणकाराचे मत्रें, उत्कृष्ट गुणाचे योगाने निकृष्ट गुण जेव्हा लोपले जातात, तेव्हां मिलित अलंकार होतो. सामान्य अलंकारांत सदृश गुण असल्यामुळें भेद दिसत नाहीं. "पुष्पें स्त्रिया घालुनि" इत्यादि श्लोकांत साहित्यदर्पणकारांच्या
सामान्य अलंकाराचे व्याख्येप्रमाणें अलंकार दृष्टीस पडतो, म्हणून त्यांनीं सामान्य अलंकारांत हे उदाहरण दिलें आहे. तसें काव्यप्रकाशकारांनीही केले आहे.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP