-
वि. १ न पिकलेला ; हिरवा ; कोंवळा ( फळ , गळूं पान इं० ). २ साफसूप न केलेला ; ओबडधोबड ( दगड , चित्र , इ० ) ३अशिजा ( भात , भाकरी , रसायन इ० ). ४ अपुरा व पक्का न केलेला ; सरासरीचा ; ठोकळ ( जमाखर्च , काम इ० ) . ५ अपुर्ण ; अपक्क ; अप्रौढ ( कट , मसलत इ० ) ६ अपुरें समजलेलें किंवा मिळविलेलें ( शास्त्र , कला ). ७ अपुर्या ज्ञानाचा ; अर्धवट शिक्षणाचा ( माणुस ). ' तो अभ्यासांत कच्चा आहे .' ८ बिन वाकबगार ; अडाणी ; संस्कारहीन ; यथातथा ज्ञान असलेला . ९ कोता अप्रौढ ; संकुचित ( विचार , बुद्धि ). १० गौण ; लहान ; कमी ( वजन , माप इ० ) ११ न टिकणारा ; लवकर नाहींसा होणारा ( रंग इ० ) १२ सविस्तर ; सर्व पोटभेद ज्या मध्यें घेतलें आहेत असा ( हिशेब ). १३ बळकट नाहीं असा ( बांधकाम इ० ) ' मातींत घर बांधूंनये , मातीचें काम अगदीं कच्चें असतें . ' १४ इयत्तेहुन वाजवीपेक्षां कमी , ' आम्हीं एका तासांत एक कच्चा कोस चालतों . ' १५ कढवून फार घट्ट न केलेला ( साखरेचा पाक . इ० ). १६ ( गणित ) त्रेराशिकांतील दुसरें व तिसरें या दोन पदांचा गुणाकार करून येणार्या रकमेस कच्चे म्हणतात . नंतर त्यांस प्रथमपदानें भागून आलेल्या भागाकारास पक्के किंवा पक्का म्हणतात ( ज्याच्यामध्ये भारी परिमाणाच्या किंमतीवरुन हलक्या परिमानाची किंमत काढावयाची असते अशा हिशेबांत उपयोग ), उ० १० शेरांस पांच रुपये , तर १॥ पावेशरास कितो . येथे ५ व १॥ ह्रांचा गुणाकार जो ७॥ ते कच्चे . १७ कामामध्यें तोटानफा हील तो मूळ धन्याचा अशा बोलीनें केलेली ( नोकरी , मामलत , इ० ); पगारी ( भक्ता न देतां नोकराकडून प्रत्यक्षपणें सारा वगैरे वसूल करण्याच्या पद्धतीला हा शब्द लावितात ). कच्चा हा शब्द अपुरा , ओबडधोबड , अप्रौढ , उणा ह्मा अर्थानें शब्दश ; व लक्षणिकरीत्या अनेक प्रकारें योजतात . उ
-
०कच्चा - लिहिणें - वर्तमान - बातमी - हकिगत - कैफियत - वरवरचें , पक्कें नव्हे तें , कसें तरी तयार केलेले ; अंदाजी . कच्चा ताळा - ताळेबंद - कीर्द - जमाबंदी - बाब - हिशेब - बेरीज ' इ० , = अपुरा ; बंद न केलेला , अपूर्ण . ( ध्व . कच ; हिं . कच्चा ; तु० सं . कथ्थ = खोटें )
-
मजकूर - लिहिणें - वर्तमान - बातमी - हकिगत - कैफियत - वरवरचें , पक्कें नव्हे तें , कसें तरी तयार केलेले ; अंदाजी . कच्चा ताळा - ताळेबंद - कीर्द - जमाबंदी - बाब - हिशेब - बेरीज ' इ० , = अपुरा ; बंद न केलेला , अपूर्ण . ( ध्व . कच ; हिं . कच्चा ; तु० सं . कथ्थ = खोटें )
-
कच्ची कोंबी करणें
Site Search
Input language: