अर्थालंकार - विकस्वर
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
श्लोक-
विशेषसामान्यविशेष जेथें । विकलस्वरालंकृति जाण तेथें ॥
अजिंक्य तो जाण समर्थ सारे । दुर्धर्षते सागर तुल्य बारे ॥१॥
येथें "अजिंक्य जाण" हें व्यक्ति विशेषास अनुलक्षून आहे. " समर्थसारे दुर्धर्ष " हें सामान्य म्हणजे सर्व तशा व्यक्तींस लागू आहे. ते
सागरतुल्य म्हणजे जसा सागर दुर्धर्ष तसे ते. यांत जसा सागर दुर्धर्ष हें विशेष व्यक्तीस लागू आहे. हीं तिन्ही एका ठिकाणी आहेत
म्हणून हा अलंकार झाला आहे.
अनंत रत्नें निघती जयांत । सौभाग्यलोपी हिम त्या न होत ॥
बहू गुणांमाजिहि दोष एक । लपे जसा शीतकरांत अंक ॥२॥
कर्णाला कटु शब्द सोडुन उगा बा बैससी तूं जरी ॥
काका आम्रतरुवरी मग तुला कोकील मानूं तरी ॥
कीं वस्तू स्थळ-वैभवेंकरुनिया मोठेपणा पावती ॥
नेपालेश्वर - भाल- लग्न चिखला कस्तूरिका मानिती ॥३॥
भृंगांक अब्ज शशिना मल आणिताती ॥
वक्रीं टिळा नयनिं काजळ कांति देती ॥
एकांत एक मिळतां गुण दोष होती ॥
भ्रांति-प्रतारण बुधोक्त गुणत्व घेती ॥४॥
सेतु बांधुनिया त्वदर्थ कमले ? रामें जना तारिलें ॥
त्यांचा हाग गमे स्वभाव रविच्या वंशांत जे जन्मले ॥
स्वर्गाहून भगीरथेंहि पितरोद्धारार्थ जी आणिली ॥
त्या गंगासलिलें पवित्र जनता सारी अहो जाहली ॥५॥
आर्या-बहु सहवास अनादरकारण नारायणासिं नेणे हा ॥
येणें हास नयो वर-मणिपरिसहि जानकीस एणेहा ॥६॥
बृहद्दशम.
आपण शिरे नळीं कलि शिरवी त्या द्वापरास पाशांत ॥
व्यसनीं भल्यासि पाडी खळ हरिणा व्याध जेंवि पाशांत ॥७॥
वनपर्व.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP