मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
भ्रांतिमान्

अर्थालंकार - भ्रांतिमान्

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


आर्या-
होतो पदार्थ देखुन भ्रम तरी तो भ्रांतिमानलंकार ॥
वदन तुझें देखुनिया मानितसे कमल मत्त हा भ्रमर ॥१॥
पळसाच्या मुकुलाचे भ्रांतीनें शुक-मुखीं भ्रमर पडतो ॥
जंबूफल - भ्रमानें भ्रमरा धरण्य़ास शुक तसा जातो ॥२॥
आर्या-नीरादानाग-मुनि-पात्र-रचाऽकर्णनें अजाणानें ॥
तापस गज-भ्रमानें वधिला मीं शब्द पाति-बाणानें ॥३॥
मंत्ररामायण.

श्लोक-
तीव्रातपें पीडित जेधवां हो ॥
मुखें मृंगांची बहु कोरडीं हो ॥
पाहून भिन्नांजनवन्नभातें ॥
पाणी असें मानुन धावती तें ॥४॥
भृंगे विराजित नवीं अरविंदपत्रें ॥
पाहून मानुन तिचींच विशाल नेत्रें ॥
घालीन अंजन अशा मतिनें तटाकीं ॥
आहा ! वृथा उतरलों भिजलों विलोकी ॥५॥
रघुनाथपंडित.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP