अर्थालंकार - वक्रोक्ति
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
आर्या-
काकुश्लेषें अर्थांतर तरि वक्रोक्त्यलंकृती होई ॥
हे सुतनु जावयाला पाहे कुठचा असेल जावाई ॥१॥
श्लोक-
मृगाक्ष्ये होतील त्रिशनवदनें म्लानचि पहा ॥
उभा राहे ऐसा न युधिंहि ससौमित्र जरि हा ॥
कपींची सेना ही विपदनुभवित्री समज हें ॥
अरे मूर्खा षष्टाक्षरपरचि टाकून म्हण हें ॥२॥
ही रावणाची सीतेला उक्ती आहे. यांत सातवें अक्षर गाळून वाचलें असतां रावणाचे इच्छेविरुद्ध अर्थ होतो.
भिक्षार्थी तो कुठेंगे सुतनु बलिमखीं नृत्य कोठें अपर्णे ? ॥
वाटे वृंदावनांतीं मृगतनय कुठें ? सुकरा मी न जाणें ॥
बाले तूं पाहिलासी स्थविर वृषपती ? गोप जाणे तयाला ॥
लीलासंलाप राखो जलनिधिहिमवत्कन्यकेचा अह्माला ॥३॥
आर्या-
कोप तुझा अनुचित हा विचार केल्याविना सुगुणसरिते ॥
नाहींच उचित बोलुन ताडण कुसुमस्त्रजें तया करिते ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP