अर्थालंकार - निरुक्ति
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
आर्या-
नामाच्या योगबलें अर्थांतरकल्पना निरुक्ति तरी ॥
ह्याच गुणांनीं वाटे दोषाकर सत्य ह्मणति भूमिवरी ॥१॥
श्लोक-
मोजितां कविश्रेष्ठ एकदां । कालिदास हा एक ये तदां ॥
नामिळे तशी मूर्ति दूसरी । हो अनामिका सार्थ ती तरी ॥२॥
कोणीही मनुष्य वस्तु बोटानें गणावयाला लागला असतां करंगळी पासून सुरु करितो. तेव्हां करंगळी स्थानापन्न कालिदास झाला.
पुढें तसा दुसरा कवी मिळाला नाहीं ह्मणून अनामिका (नाम नाहीं अशी) तशीच मिटावयाची राहिली यामुळें ती सार्थच झाली.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP