अर्थालंकार - भावशबलता
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
आर्या-
पूर्वीचे भावाचा उपमर्द करुन अन्य भाव जरी ॥
नानाविधचि उपजती अन्यांगी भावशबलता च तरी ॥१॥
श्लोक-
कोठें विप्रसुता शशीकुल ! पुन्हां पाहीन कां मी हितें ॥
पापाचा शम व्हावया श्रुत, दिसें क्रुद्वास्य ही कांत तें ॥
धीमान् जे वदतील काय मजला ? स्वप्नीं दुरापा अहो ॥
चित्ता स्वस्थ रहा प्रियाधररसा स्वादी असा कोणा हा ॥२॥
येथें वितर्क, औत्सुक्य, मति, स्मरण, शंका, दैन्य, धृति, व चिंता यांची एकामागून एक अशी उत्पत्ती आहे; आणि त्या योगें विप्रलंभ
शृंगाराला पुष्टी आली आहे.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP