अर्थालंकार - प्रतिवस्तूपमा
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
अनुष्टुप्-
उपमानोपमेयांचा एक सामान्य धर्म जैं ॥
पृथकत्वें दाविती तेव्हां प्रतिवस्तूपमा ह्मणा ॥१॥
सद्वत्त गुणवंताचें न फिरे खलबुद्धिनें ॥
ज्योत ती रत्नदीपाची न जाते पवनें कधीं ॥२॥
येथें "रत्नदीपाची ज्योत" हें उपमान आहे, व गुणवंताचें सद्वत्त हें उपमेय आहे. नाहिसें न होण्याचा धर्म एकच असून दोहोत
भिन्न शब्दांनीं मात्र दाखविला आहे.
एक धर्म दाखवितांना अर्थाची आवृत्ति स्वाभाविकच होते. ह्णणून अर्थावृत्तिदीपक व प्रतिवस्तूपमा यांत भेद दाखविला पाहिजे.
अर्थावृत्तिदीपकांत सर्वच प्रस्तुत किंवा सर्वच अप्रस्तुत असें असलें पाहिजे. प्रतिवस्तूपमेंत कांहीं प्रस्तुत किंवा सर्वच अप्रस्तुत असें असलें पाहिजे. अर्थावृत्तिदीपक वैधर्म्यानें होत नाहीं. प्रतिवस्तूपमा वैधर्म्यानें होते. जसें,
श्लोक
तव चरणसरोजीं लीन आत्मा जहाला ॥
तरि मग दुजयाची त्यास इच्छा कशाला ॥
सरसिज-मकरंदीं लुब्ध जो भृंग झाला ॥
तरि मा नच इच्छा इक्षुची हो तयाला ॥३॥
अनुष्टुप्-विद्वान मात्र समजे विद्वज्जन परिश्रम ॥
वंध्या जाणे नच कदां प्रसूतीवेदना कशी ॥४॥
आर्या-जरि असती गुणगण तरि पुरुषाचे प्रकट ते स्वयें होती ॥
मृगमदगंध कळाया द्यावी लागे न शफतहि कदां ती ॥५॥
श्लोक-बाणें जरि हलविलें बहु तें करांहीं ॥
हाले महेश्वरधनू न मुळींच कांहीं ॥
कामातुरें विनविलें बहु भाषणांहीं ॥
साध्वी-मनास नच होय विकार कांहीं ॥६॥
आर्या-
रक्षाया बांध सरीं काढावें लागतें अधिक जल तें ॥
दु:खा-वेगीं हृदयहि विलाप-वचनींच राखिलें जातें ॥७॥
मीन बहु प्रकट जगीं व्हाल तुह्मी सर्व-बंद्य न ख्यात ॥
तात क्षीरधि, परि हर-चूढारुढ प्रसिद्ध तज्जात ॥८॥
बृहद्दशम.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP