मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
विधि

अर्थालंकार - विधि

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


आर्या-
सिद्ध अशा वस्तूचें जैं विधान तेव्हां अलंकृती विधि हो ॥
पंचमसुरांत गायन करि कोकिल तेधवांच कोकिल हो ॥१॥

श्लोक-
रे रे दक्षिण हस्त विप्रसुत हा जीवंत व्हावा तरी ॥
शूद्रांतील मुनी पहा तप करी सोडी असी यावरी ॥
रामाचेंच शरीर तूं तुज दया कैची, विदेहात्मजा ॥
ज्यानें गर्भभरालसा जणु दिली रानीं बली सावजां ॥२॥

आर्या-
ढकली मणि पायानें कांच जरी आदरें धरी स्वशिरीं ॥
क्रय-विक्रय-प्रसंगीं मणि तो मणि कांच तीहि कांच तरी ॥३॥

श्लोक-
अभ्राच्छादित जी नसे पुनव हो ती यामिनी यामिनी ॥
जी सौंदर्य-गुणान्विता पति रता ती कामिनी कामिनी ॥
जी गोविंद रस-प्रमादे-मधुरा ती माधुरी माधुरी ॥
जी लोकद्वय साधिते मज गमे ती चातुरी चातुरी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP