अर्थालंकार - अन्योन्य
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
श्लोक-
परस्परीं जैं उपकार झाला । अन्योन्य तेव्हां समजा तयाला ॥
शशीमुळें रात्रहि शोभताहे । रात्रीमुळें चंद्र तसाच पाहे ॥१॥
आरोहणें रुद्र नृपाधिपाचे । शोभे नृपालासन फार साचें ॥
तल्लग्न तेजाळ मणिप्रभावें । अतीव शोभा नरवीर पावे ॥२॥
पांथस्थ ऊर्ध्वाक्ष जसाजळातें । पियी करोनी विरलांजलीतें ॥
त्या पाणयोयीवर कन्यका ते । तशी तशी धार तनू करीते ॥३॥
पाणी देण्याचे मिषानें पथिकाचें रम्य मुख पुष्कळ वेळ पहावयास मिळेल या आशेने निबद्ध आशा सुंदरीस पाहून पथिकानें
ओंजळीची बोटें विरळ करुन पाणी पुष्कळ जाऊं दिलेलें पाहून त्या स्त्रीनेंही आपलें मुख पथिकानें पुष्कळ वेळ पहावें ह्णणून धार लहान केली. यांत परस्परांचा परस्परांवर उपकार झाला आहे.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP