मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
भावसंधि

अर्थालंकार - भावसंधि

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


आर्या-
जरि हो विरुद्ध - भाव - स्पर्धा तरी भावसंधि त्या ह्मणती ॥
ती अंगभूत असतां अलंकृतित्वास पावते हो ती ॥१॥

श्लोक-
होणार्‍या विरहश्रमास असहा लोलाक्षितें पाहतां ॥
युद्धाडंबर ऐकवीत असतां वीरा तुझा तत्वता ॥
भासे एक कपोलभाग पुलकें कामेषुधीचे परी ॥
तैसा मंगलपालिके परि दुजा कांतीस तो स्वीकरी ॥२॥
येथें स्त्रीविषयी प्रेम व युद्धाविषयीं औत्सुक्य या दोन विरुद्धभावाचा
संधि आहे; आणि हा प्रभुविषयक भावाच्या अंगभूत आहे.

आर्या-
रे सहदेवा सत्वर पुष्कळसा अग्नि आण जाच कसा ॥
जाळूं याचे हे कर आह्मां हा सोसवेल जाच कसा ॥३॥
सभापर्व.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP