अर्थालंकार - एकावली
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
आर्या-
पूर्वोत्तर अर्थी जरि एक विशेषण दुजा विशेष्य असा ॥
ये पदसमूह तेव्हां एकावलि ती अलंकृती परिसा ॥१॥
आकर्ण नेत्र ज्याचे कर्ण भुजस्तंभ दोलित जयाचे ॥
भुज जानूपर्यंतचि जानुहि रत्नापरी नृपालाचे ॥२॥
श्लोक-
न वारितें जेथ न चारुपंकजें । न पद्यते भृंगकुलीं न युक्त जें ॥
न भृंग गुंजारव जो न हो करी । न तो न गुंजारव जो मना हरी ॥३॥
गद्य-
कोठें कोठें विशेष्यही वरचेप्रमाणें दृष्टीस पडतें. जसें:-
आर्या-निर्मल असती विहिरी विहिरीमध्येंहि उगवतें कमल ॥
कमलीं अलिपुंज पडे अलिपुंजीं गीत चालतें विमल ॥४॥
श्लोक-दिक्कालात्मसमान वैभव असे ज्याचें, प्रकाशें तिथें ॥
भारी जो, अमृतासमान किरणें याचीं जिथें, तो जेथें ॥
हो, तप्तित्तचि जो, तयास हवि दे जो, प्राणजाला तया ॥
जो, जीचें गुण घेइ तो, हरतनू रक्षोत आह्मांस या ॥५॥
येथें एकांत एक गोंवलेल्या अशा, आकाश, सूर्य चंद्र, जल, अग्नि, यजमान, वायू व पृथ्वी या शिवाचे आठ तनूंचे वर्णन आहे.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP