अर्थालंकार - विवृतोक्ति
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
आर्या-
विवृतोक्ति जरि श्लेषें गूढार्था प्रगट केलिया कविनें ॥
"हो वृषभ दूर" इत्यादिक वचनीं सुचविलें तिला सखीनें ॥१॥
श्लोक-
वत्से टाकी विषादा; श्वसन न बरवा, यास सोडून देई; ॥
कंपा सोडी गुरुला न वरि बलभिदाजृंभिता तेथ जाई ॥
ऐसी सर्वा सुरांचें प्रतरण करुनी व्याजवाक्यें सुतेला ॥
क्षीराब्धी दे जयाला मुरहरि तुमच्या सर्व जाळो अघाला ॥२॥
येथें समुद्राचा हेतु गूढ शब्दांनीं दर्शविला असतां तो कवीनें प्रगट केला आहे.
दैवें केशव गोपराहगत मीं कांहीच ना देखिलें ॥
त्या योगें फसलें दयाळ पतिता त्वाम पाहिजे रक्षिलें ॥
तूं होशी विषमुषु-खिन्न हृदया सर्वाबलांची गती ॥
गोपी यापरि ती, ससूचन वदे राखो गुह्मां गोपती ॥
जातें अच्युत दर्शनेंकरुनिया तृप्ती न बा होय ती ॥
एकांती बसतां कुतर्क भलते हे लोंक बा काढिती ॥
ऐसें बोलुनिया वृथा-स्थितिमुळें हो खिन्न गोपी तदां ॥
आलिंगोन हरी करी पुलकिता राखो तुह्मां तो सदां ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP