अर्थालंकार - काव्यलिंग
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
आर्या-
पुष्टीकरणापेक्षा असतां अर्थास पुष्टि जरि दिधली ॥
तरि काव्यलिंग मदना तूं जित माझे मनीं वसे शूली ॥१॥
येथें मदनाला जिंकणे हें फार कठिण आहे. ह्णणून " तूं जित आहेस."
या बोलण्याला बळकटी यावी ह्णणून "माझे मनीं शंकर राहतो आहे " हें दर्शविलें आहे.
श्लोक-
भस्मा क्षेम तुला असो कुशल हो रुद्राक्षमाले सदां ।
सोपानालि तुलाहि भद्रचि असो कैलासशोभाप्रदा ॥
शंभूच्याच कृपेकरुन तुमच्या पूजा सुखोच्छेदकीं ।
मोठा मोहचि मोक्ष जो तदुपरी झालों अह्मी लीन कीं ॥२॥
येथें मोक्षाचें महामोहकत्व अप्रसिद्ध आहे तें सिद्ध करण्याकरितां "पूजासुखोच्छेदकीं" हें पद घातलें आहे.
जयशीलचि केश पुढें जरी । दमयंती धरिते सदां शिरीं ॥
पशुही न जया पुढें करी । तुलने चामरपात्र ना तरी ॥३॥
तनूपाधीयोगें मज गमतसें पूर्व शरिरीं ।
गिरीशा कोठेंही तुज न नमिलें मीं कधिं तरी ॥
विदेही मी झालों नतिरहित आतांहि नमुनी ।
क्षमेला हें व्हावें पद मदपराधद्वय मनीं ॥४॥
आर्या-
लक्ष्मीचें अधरामृत सेवुन राहो मुरारि उल्हासें ॥
सागरमथनक्लेशा मानुनिया विफल वासफल ऐसें ॥५॥
येथें सागर मथनाचे क्लेश सफल किंवा मानण्यास लक्ष्मीचें सफल व अधर-रस-माधुर्य असतां अमृत हें व्यर्थ आहे असें वाटल्यानें
विफल.
कल्याणी जीववीगे तूंच जगत्पालका तुझ्या पतिला ॥
हस्त-स्पर्श तुझा हा प्रिय येथें सतत राम अनुतरला ॥६॥
श्लोक-अपर्णेचें जेव्हां सहन करवेंना तप अती ।
तिच्या गोष्टीमध्यें रतिहि पण ना होय कमती ॥
प्रमोदातें देवो कपट बटुवेषा दवडितां ।
त्वरा ज्याला झाली तशिच पणा आली शिथिलता ॥७॥
आर्या-ज्याचा संकल्पचि हें अद्भुत ऐसें अतर्क्य विश्व रची ॥
अत्यद्भुत पुरतेकां नोहे शिल्पी जयास ईश्वरची ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP