अर्थालंकार - उत्तर
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
श्लोक-
कांही अभिप्राय असून जेथें । गूढोत्तरें उत्तर जाण तेथें ॥
जेथें असें मंडप वेतसीचा । उतार तेथेंच असे नदीचा ॥१॥
नदीला उतार कोठें हें पांथस्थ विचारीत असतां ती स्त्री त्यावर साभिलाष होऊन वेतसलतेच्या कुंजापाशीं रस्ता आहे हें तिनें
सांगितलें. यांत तेथें आपणांस स्वच्छंदे विहार करण्यास सांपडेल असें गुप्तरीतीने दर्शविलें आहे.
पांथस्थ पाषाणमयीं न कांही । गांवीं मिळे या समजून राही ॥
इच्छा जरी होय रहावयाला । पयोधरोच्चत्व पहावयाला ॥२॥
आर्या-
सखि कुशल कीं तियेचें ? आहे जीवंत मी कुशल पुसतों ॥
आहे जीवंत असा जाब दिला म्यां तुह्मां न कां हो तो ? ॥३॥
पुनरपि तसेंच सांगसि काय सखि स्पष्ट वृत सांगावें ॥
असतां जीवित मी ती मेली ऐसेंइ काय बोलावें ॥४॥
प्रश्नांत उत्तर असें तरि चित्रोत्तर तया म्हणति कांहीं ॥
काय ? विषम देवगतीं दुर्लभ कोण जो? गुणग्राही ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP