मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
अतिशयोक्ति

अर्थालंकार - अतिशयोक्ति

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


अनुष्टुप्‍ -
उपमानपदें जेव्हां । उपमयेचि जाणिजे ॥
रुपकातिशयोक्तीते । नीलाब्जोत्पन्न - मार्गण ॥१॥

येथें नीलाब्ज व मार्गण हीं उपमानपदें आहेत व नेत्र आणि कटाक्ष हीं उपमेयें आहेत. नीलाब्ज=नील कमल व मार्गण=बाण या
शब्दांनीं नेत्र व कटाक्ष या शब्दांचे ग्रहण आहे.

श्लोक-
वापी कोणी गगनिं दिसते तीपुढें ऐंद्रनीला ॥
पद्या शोभे तदुपरि दिसे हैम-सोपान-माला ॥
अग्रीं दोघे गिरि सुगम ते व्याप्त जे चंदनानें ॥
तत्र त्यांना सुलभचि सुधा इंदुच्या संन्निधानें ॥२॥

हें मध्य भागापासून तों मुखापर्यंत नायिकेच्या अंगांचें वर्णन आहे. येथें वापी, पद्या, सोपानमाला, गिरी व इंदु, य शब्दांनीं नाभी,
रोमावळी, त्रिवळी, स्तन व मुख, यांचें ग्रहण आहे.

चकोरांनीं रानीं अमृत-अशना लागि वरिली ॥
अशी ज्योस्त्रा ज्यानें विमलतर लोकीं पसरिली ॥
अनाकाशीं ऐसा गलितमृगसा शीतकर हा ॥
जरा प्राकाराग्रीं नजर तरि फेकूनचि पहा ॥३॥

येथें शीतकर या शब्दानें सुंदरीचें मुखाचे ग्रहन आहे. याप्रमाणेंच.

आर्या-
हरिच्या पुन: पुन्हां कां काडया नाकांत घालिशी शशका ॥
यश काय पक्षिपतिचें येइल हे चार करुनिया मशका ॥४॥
सभापर्व.
गद्य-
ह्यास रुपकातिशयोक्ति ह्णणतात.

श्लोक-
मोतीं विद्रुम यामधें मधुरता पुष्पीं नसें त्यापरी ॥
त्या वस्तू विधुमंडळींच दिसती नाहीं कदां सागरीं ॥
तेंही मंडल शंखमूर्धि उदया पावे न पूर्वे कदां ॥
ज्यांही तीस न पाहिलें जन असे ते कल्पिती सर्वदां ॥५॥

येथें मोतीं, विद्रुम-पोवळे,विधुमंडल व शंख, या शब्दांनीं कामिनीचे दांत, अधर, मुख, व कंठ यांचें ग्रहण करावयाचें आहे. पुष्पांत
मधुरता तशी नाहीं. जशीं मोती व विद्रुम ह्णणजे कामिनीचे दांत व अधरोष्ठ यांमध्ये आहे, इत्यादि अर्थांनीं अपन्हुतीही दाखविली आहे.
गद्य-
हीस सापन्हवातिशयोक्ति ह्णणतात.
आर्या-हीस भेदकातिशयोक्ति ह्णणतात.

आर्या-
जरि वीर रुद्रराजा दाता तरि नष्ट अल्प दिवसांत ॥
हो कनकगिरी जाणुन कोकी आनंदयुक्त होतात ॥७॥

गद्य-येथें मेरु नाहींसा होण्यास वीररुद्रराजाचें दातृत्व कारण होणार आहे. ही अतिशयोक्ति आहे. चक्रवाकींना आनंदयुक्त होण्याचें
कारन इतकेंच कीं, मेरु नाहींसा झाला असतां सूर्याचें तेज नेहमीं राहील व रात्र कधींही होणार नाहीं. आणि असे झालें असतां त्यांचा
व पतीचा विरह कधींही होणार नाहीं हे आहे. तसेंच.

श्लोक-
जो अबरीं उफळतो खुर लागलाहे ॥
तो चंद्रमा निजतनूवर डाग लाहे ॥
जो या यशास्तव कसें धवलत्व नेघे ॥
शृंगारिला हय तयावरि भूप वेधें ॥८॥
रघुनाथपंडित.

गद्य-
हीस संबंधातिशयोक्ति ह्नणतात.

आर्या-
स्तनमंडलें अनिंद्ये ! हीं दिवसोंदिवस वाढतीं समदें ॥
बाहुलतांच्यामध्यें यांना अवकाश ना मिळे प्रमदे ॥९॥

गद्य-
हीस असंबंधातिशयोक्ति ह्णणतात.
श्लोक-हम्मीर खड्गेंत्यजितांच कोशा ॥
सोडून देती अरिकोश आशा ॥
होतां तया कंप अरीस होतो ॥
तत्प्राणही तें सुटतांच जातो ॥

गद्य-
हीस आक्रमातिशयोक्ति ह्णणतात.

श्लोक-
घ्यायाला कुसुमांकडेस बघतां हस्ताग्र तें लाल हो ॥
लाक्षारंजनशब्द ऐकुन तिचीं होतीं पदें लाल हो ॥
देतां आटव चंदनादिउटिचा हो दु:ख भारी तिला ॥
हा ! तीतें कबरी-सुगंधविरहें भारापरी जाहला ॥११॥
आर्या-जातों मी नचि जातों वदतां प्रियकर क्षणांत सुतनूचीं ॥
मळलीं पुढलीं वलयें उरलीं फुटलीं तशींच तीं साची ॥१२॥
गद्य-ह्यास चपलातिशयोक्ति ह्णणतात.

श्लोक-
अधींच बहु अंगणीं कविवरांचिये बांधिले ॥
करी मद-जलार्थ त्यांस मधुपीं अति त्रासिलें ॥
तशांत पडले पयोदधि - महत्तरंगापरी ॥
कटाक्ष-चय काकतीय-पतिचे तयाचे वरी ॥१३॥

गद्य-
हीस अत्यंतातिशयोक्ति ह्णणतात.
निजरक्तें नाहविले शोणित तटिनींत भट सगज वाहविले ॥
यवस धरचि राहविले अमरा नृत्यत्कबंध पाहविले ॥१४॥
बृहद्दशम.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP