मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
प्रस्तुतांकुर

अर्थालंकार - प्रस्तुतांकुर

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


अनुष्टुप्‍-
प्रस्तुतानें प्रस्तुतांचे वर्णनीं प्रस्तुतांकुर ॥
असतां मालती भृंगा केतकी कासया हवी ? ॥१॥

गद्य-
येथें उद्यानांत फिरतांना एका सुंदर स्त्रीची दुसरे स्त्रीचे संबंधानें पतीस उद्देशून भ्रमरास उक्ति आहे. येथें दोन्हीही भ्रमर व पतीजवळ
आहेत. ह्णणून प्रस्तुत आहेत. याप्रमाणेंच.

श्लोक-
आहेत अन्य उपमर्द सहाहि वेली ॥
त्यांमाजी षट्‍पद अरे बहु खेळ केली ॥
बाला अजात-रजसा नव मालतीची ॥
तूं कासया दुखविशी कलिका फुकाची ॥२॥
जागे रहा नेत्र तुह्मी शिवाची । ही आजची रात्र असेच साची ॥
समान धर्मा तुमचे नजीक । सखा अहो होइल कश्चिदेक ॥३॥
येथें शिवरात्रीचें महात्म्य वर्णन प्रस्तुत आहे; आणि हिचें फल जें

शिवसारुप्य तें " तृतीय नेत्र उत्पन्न होईल" अशा एकदेशीय वाक्यानें
दाखविलें आहे.

हे गौरी ! तव केशपाशतिमिरा नाशास जो देतसे ॥
तो बालार्क करास लाजवि असा सिंदूर भांगी वसे ॥
आंबे ! भांग तुझा मनोहर तुझ्य़ा सौंदर्यवार्राशिची ॥
लाटानिर्गमपद्धतीच गमतो रक्षा करो आमुची ॥४॥
हंसानें निजचंचुनें कमलिनी कोशा पहा टोचिलें ॥
हें देखे सहकारनूतनदला पुंस्कोकिलें चाविलें ॥
ऐसें ऐकुनिया परस्पर सखीबोलास वापीतटीं ॥
हातानें अधरा स्तनांस पदरें झांकीतसे गोमटी ॥५॥
तूं बा कोणीच ? दैवहीन मजला ते शेवरी बोलती ॥
वैराग्यें वदसी ? भलें समजला. कां बा अशी हो गती ॥
डाव्या, बाजुस हा असे वड तिथें पांथस्थ जाती सदा ॥
छायाही न परोपकारकरणी माझी असे हो कदा ॥६॥

गद्य-
काव्यप्रकाशकारांनीं या अलंकारास अप्रस्तुतप्रशंतेंतच - ढकलिलें आहे.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP