मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
समासोक्ति

अर्थालंकार - समासोक्ति

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


श्लोक-
हो प्रस्तुताचे कथनांत भास । अप्रस्तुताचा समजा तयास ॥
तेव्हां समासोक्ति, शशी पहा हा । प्राचीमुखा चुंबितसे अहाहा ! ॥१॥

गद्य-
येथें प्रस्तुत चंद्रोदयवर्णन करणें असतां अप्रस्तुत जें कामुक पुरुषाचें स्त्री-मुख-चुंबन हें गुप्त दाखविलें आहे.

श्लोक-
जिथें होते पूर्वी प्रवहचि तिथें आज पुलिनें ॥
तरि होते जेथें विरल बहु तेथें घन बनें ॥
बहूतां वर्षानीं विपिन दुसरेंसें मज दिसे ॥
जयीं शैला देखे विपिन न दुजें हें गमतसें ॥२॥

गद्य-
सीतेचा त्याग केल्यानंतर राम शूद्र तपस्व्याच्या शोधार्थ दंडकारण्यांत गेला असतां, तेथील पूर्वींचे, व नवीन स्थितींत फेर पडलेला पाहून वर प्रमाणें उद्गार काढले आहेत. येथें वनवर्णन प्रस्तुत असून संपत्ति व विपत्ति एका मागून एक भोगलेल्या पुरुषाचे संबंधानें ग्राम व नगरांचें अप्रस्तुत वर्णन सुचविलें आहे.

श्लोक-
हाले हा स्तनभार, केश सरले, हारावली लोंबळी ॥
गालीं चंचल कुंडलें झळकलीं ये घाम वत्क्रोत्पलीं ॥
वारंवार कर-प्रहार करितां नि:श्वास टाकी जरी ॥
तस्मात्कंदुक तूं कृतार्थ सुतनू सेवी तुला यापरी ॥३॥

गद्य-
यांत लीला-कंदुकाविषयीं वर्णन प्रस्तुत असून विपरीत रतांत सक्त झालेल्या सुंदरीचें अप्रस्तुत वर्णन सुचविलें आहे.
 
आर्या-
फुललेल्या कमलांतुन येथच्छ मधु पिउनिया अली आला ॥
झाला मधुगंध नसे ज्यांत अशा चुंबितो पहा मुकुला ॥४॥

गद्य-
यांत मधुकराचें वर्णन प्रस्तुत पुरुषाचें अप्रस्तुत वर्णन सुचविलें आहे.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP