मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
आवृत्तिदीपक

अर्थालंकार - आवृत्तिदीपक

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


अनुष्टुप्‍-
आवृत्तिदीपकाची जैं तेव्हां आवृतिदीपक ॥
वर्षते मेघमाला ही वर्षते रजनी तशी ॥१॥
कंदबपुष्पें फुलतीं उलती कुटजोद्गम ॥
माजती मोर तैसेच तृत्प चातक माजती ॥२॥

गद्य-
हें आवृत्तिदीपक तीन प्रकारचें आहे.
१  दीपरथानीय जें पद त्याची पुनरुक्ति.
२  दीपस्थानीय जो अर्थ त्याची पुनरुक्ति.
३  दीपस्थानीय जें पद व अर्थ त्या दोघांची पुनरुक्ति.

पहिले श्लोकांत दीपस्थानीय पद ॥ वर्षते ॥ याची पुनरुक्ति आहे,
पण अर्थ भिन्न आहेत. पहिल्या ॥ वर्षते ॥ या शब्दाचा अर्थ ॥ वर्षाव
करिते ॥ असा आहे. दुसर्‍या ॥ वर्षते ॥ याचा अर्थ ॥ वर्षासारखी होते ॥
असा आहे.

दुसरे श्लोकांतील पहिले चरणांत ॥ फुलतीं ॥ व ॥ उलती ॥ ही दोन पदें भिन्न असून अर्थ एकच आहे. दुसरे चरणांत ॥ माजतीं
हाच शब्द पुन्हां आला असून अर्थही तोच आहे.

दुसरी उदाहरणें.
आर्या-उत्कंठा करिताती मयूरमाला पयोदवर्गचि हे ॥
उत्कंठा करिताती तरुणांच्या मानसीं मदनशर हे ॥१॥

मेघ मयूरमाला (मोरांचासंघ) उत्कंठा ( ऊर्ध्वकंठ ) अशी करितात. व मदनाचे बाण तरूण पुरुषाचे मनांत उत्कंठा उत्पन्न करितात. येथें "उत्कंठा करिताती" या पदाची पुनरुक्ति आहे. परंतु अर्थ भिन्न आहेत.

घनसलिल चातकाच्या बहुदिवसांच्या तृषेस शमवीतें ॥
पुरुष-प्रवास-इच्छा स्त्रीलोचनजल समग्र घालवितें ॥२॥

येथें " शमवितें" व " घालविते" हीं पदें भिन्न आहेत, परंतु अर्थ तोच आहे. ह्णणून अर्थाची आवृत्ति आहे.

मदनानें जिंकियलें शशिबिंब ढगांत नाहिसें होतें ॥
सरसिज तसेंच सुंदरि उदकामध्येंच नाहिसें होतें ॥३॥

येथें " नाहिसें होतें " हें पद पुनरुक्त असून अर्थही तोच आहे.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP