मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
भाविक

अर्थालंकार - भाविक

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


आर्या-
जेव्हां भूतभविष्यें होती दृष्टीपुढें असें कथिती ॥
भाविक तें मी बघतों लढती अद्यापी देवदैत्यतती ॥१॥

श्लोक-
हा ! वस्त्रा ! ख ऐकुन मी तयाला ॥
झालों प्रवृत्त वसना उचलावयाला ॥
गालीं विलोकुन हसे मज तेधवाचें ॥
दृष्टीसमोर दिसतें स्मित मत्प्रियेचें ॥२॥
तें हें जनस्थान खरादिकांचे । जें जाहलें स्थानचि राहण्याचें ॥
जें जें इथें वृत्त घडोन आलें । प्रत्यक्षसें तें मज आज झालें ॥३॥

आर्या-
स्मरतें कीं, तें जें श्रीगुरुदारांहींच इंधना - नयना ॥
पाठविलें विपिनाला माझ्या दिसतें तपोधना नयनां ॥४॥
बृहद्दशम.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP