मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
सूक्ष्म

अर्थालंकार - सूक्ष्म

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


श्लोक -
पराशयाभिज्ञ अशा नराची । साकूत चेष्टा तरि सूक्ष्म तेची ॥
हातांत सीमंत मणी धरोनी । ती खूण दावी मजला कचांनीं ॥१॥
संकेतवेळा समजावयाला । इच्छी असें जाणुन ती तयाला ॥
लीलाब्जनेत्रें मिटवून दावी । ती काय चातुर्यकला वदावी ॥२॥

गद्य-
यामध्यें कमल मिटवून दाखविलें, यांत सूर्यास्त झाल्यावर रात्रीं संगम होईल असें मदनपीडित प्रियास प्रियेंनें सुचविलें.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP