मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
प्रौढोक्ति

अर्थालंकार - प्रौढोक्ति

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


श्लोक-
उत्कर्षहेतुत्व नसोन जेथें आहे असें मानिति जाण तेथें ॥
प्रौढोक्ति होते, यमुनातटांचे । तमाल काळे बहुसाल साच ॥१॥
येथें यमुनेचे काठचे असल्यानें तमाल वृक्ष ज्यास्ती काळे आहेत. असें दर्शविलें आहेत. परंतु वस्तुत: त्यांचे काळे असण्याचें कारण
तें नव्हे.

आर्या-
कल्पतरु - कामधेनू - चिंतामणि - धनद - शंख यांच्या हो ॥
रचिला पराग- भर पय तेज: श्वासांतरां बरीं हा हो ॥२॥

येथें राजाचें दातृत्व अतिशय होण्यास कल्वृक्षाचा पराग इत्यादिकांनीं तो निर्मिला आहे, असें कारण सांगणें रास्त नसून आहे असें
सांगितलें आहे.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP