अर्थालंकार - संसृष्टि
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
आर्या-
तिलतंदुलसम मेलन अलंकृतीचें तरी च वदतात ॥
संसृष्टिअलंकारचि साफ दिसे भेद या अलंकृतित ॥१॥
श्लोक-
कुसुमगंध मिळो ह्मणुनी अली । फिरतसे ह्मणुनी बहु शोभली ॥
चलित होय तदां कलमेखला । कलकलात्मक शब्द चि जाहला ॥२॥
येथें शब्दालंकारांतील अनुप्रास व यमक यांची संसृष्टि आहे.
आर्या-
तम जैसें अंगाला चिकटें नभ जेंवि काजळा ओती ॥
जैसी दुर्जनसेवा तैसी निष्फळचि होय दृष्टी ती ॥३॥
येथें उत्प्रेक्षा व उपमा या दोन अर्थालंकारांची संसृष्टि आहे.
श्लोक-आनंदयुक्त - हरि - हस्त - विमुक्त - पुष्पीं ॥
जे अर्चिले हतजयें महिष प्रतापी ॥
देवोपदाब्ज जय तें मज अंबिकेचें ॥
मंजरि - सिंजित अहो बहु मंजु ज्याचें ॥४॥
येथें अनुप्रास व उपमा यांची संसृष्टि आहे. पदाब्ज हा उपमित समास आहे. आणि याचा विग्रह ( अब्जमिव पदं) अब्जासारिखें
पद असा करावयाचा. रुपक करुन अब्ज प्रधान गणलें तर त्याचा मंजीर-सिंजित या पदाशीं अन्वय कसा करावा ? तेव्हां येथें उपमालं-कारच आहे. असें मानिलें पाहिजे.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP