अर्थालंकार - ऊर्जस्वित्
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
आर्या-
रस-भावा भासजिथें पोसाया अंगभूत हो तरि ती ॥
ऊर्जस्विदाख्य तेथें अलंकृती विबुध सर्व वदताती ॥१॥
श्लोक-त्वच्छत्रू-युवती भयें करुनिया जाती पळोनी वनीं ॥
तेथें भिल्ल लुटावयास मग त्या येती तया पाहुनी ॥
त्यांच्या ते तरल स्तनांस नयनां पाहून नष्टस्मृती ॥
होताती पुलकांकिताचतनु हो ते स्तब्धची राहती ॥२॥
गद्य-
येथें ऋंगाररसाची प्रवृत्ती राजवनितांचे संबंधानें अनुचित आहे, ह्मणून ऋंगाररसाचा आभास मात्र आहे; आणि तो प्रभुवि-विषयक रतिभावाच्या अंगभूत आहे.
श्लोक-
तुज पाहुन शत्रुसंघ तो । तनुचें सार्थक सत्य मानितो ॥
नृपते तुजलागि आदरें । रणरंगीं विनवी असें च रे ॥३॥
येथें शत्रूंचा अनुचित भाव दाखविला आहे; आणि तो प्रभुविषयक रतिभावाच्या अंगभूत आहे.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP