अर्थालंकार - निदर्शना
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
अनुष्टुप्-
उपमानोपमेयांचे होतां वाक्यार्थ सारिखे ॥
ऐक्यारोप जरी त्यांचा ह्णणा तीस निदर्शना ॥१॥
दात्याची सौम्यता जे तें अकलंकत्व इंदुचें ॥
नील पंकजलीलेतें दाविती नेत्र हे तुझे ॥२॥
येथे दात्याची सौम्यता हें उपमेय वाक्य आहे, व चंद्राचें अकलंकत्व हें उपमानवाक्य आहे; व त्यावर ऐक्यत्वाचा आरोप केला आहे.
श्लोक-
उदंड रडलें वनीं शवतनू जशी मर्दिली ॥
स्थलीं जलज रोंविले उखर भू जलें व्यापिली ॥
श्वपुच्छ ऋजु राखिलें बधिर हा जसा बोधिला ॥
अचक्षुसचि भिंगसा जरिच अज्ञ हा सेविला ॥३॥
आर्या-
त्वद्रत्नतस्कराला केला मी बोध फार आरडलों ॥
अंध-भसित-बधिरीं तें दीप-हवन-गीत कीं वनीं रडलों ॥२॥
रामायण.
अनुष्टुप्-
राजसेवा मनुष्यांना खड्गाची धार चाटणें ॥
आलिंगनाचे व्याघ्राचें सर्पिणीं-मुख चुंबिणें ॥४॥
आर्या-सत्यासत्यार्थाचें बोधन होतें जरी क्रियायोगें ॥
राजविरोधी नाशा पावे हे क्षीण तम पहा सांगें ॥५॥
अनुष्टुप्-सविता उदया येतां पंकजा बहु शोभवी ॥
संपत्तीचें हेंअ फल आप्तपोषण सूचवी ॥६॥
आर्या-उन्नत पद मिळुन लघु जो तो सहजचि पडेल सुचवीतें ॥
गिरि शिखर-पतित-जल-कण-अध:पतन मंद वायुनें हो तें ॥७॥
पतिविरहें पांडुरता गालीं गौडस्त्रिच्या दिसे जी ते ॥
खजुरीच्या मंजरिच्या गर्भी रेणूंमध्येहि ती दिसते ॥८॥
श्लोक-तुजसम शिव दाता हा अम्हां याचकांना ॥
असुन इतर दात्या भाकितों दैन्य नाना ॥
कठिण पकडण्या जो दूध त्याचें मिळाया ॥
करभनजिक जातो कामधुक् सोडुनिया ॥९॥
आर्या-चूडामणिस्थलीं जो धरितो उदयाद्रि चंडकिरणाला ॥
दावीतसे सतांचें आतिथ्यचि कर्म हें गृहस्थाला ॥१०॥
गद्य-
वरील दुसरे श्लोकांतील दुसरे चरणाच्या निदर्शनेला पदार्थ वृत्तिदर्शना असें कित्येक ह्णणतात. येथें स्त्रियेच्या नेत्रावर नीलपंकज
लीलेचा आरोप केला आहे, ह्णणजे उपमेयावर उपमान धर्माचा आरोप केला आहे. श्लोक (८) यांत उपमानावर उपमेय धर्माचा आरोप
केला आहे.
प्राचीन कवींनीं श्लोक (८) हा वाक्यार्थवृत्तिनिदर्शनेंत घेतलां आहे; परंतु कुवलयानंदकाराचे मत्तें, वाक्यांतील विशेष धर्माचा जेव्हा
एके ठिकाणी आरोप करावा, तेव्हा वाक्यार्थवृत्तिनिर्शना होते, व उपमानोपमेयांच्या धर्माचा जेव्हां एकमेकांवर आरोप होतो, तेव्हां
पदार्थवृत्तिनिदर्शना होते, असें आहे.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP