अर्थालंकार - अनुकूल
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
आर्या-
प्रतिकूलता जरी हो अनुकूल तरीच तेंच त्या नाम ॥
जरि कोपलीस सुंदरि भुजपाशीं बांध कंठ दृढ परम ॥१॥
आर्या-
श्रीकृष्ण ह्मणे बांधावें चित्त याचि जरि कामीं ॥
तरि बांध या भुजाहीं पाहे राहे रुसोनि न रिकामीं ॥२॥
मोरोपंत-राधाकृष्ण संवाद.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP