अंबा कोणी दाखवा मजला वेडी झाले फारगे देवी कुणी ॥धृ॥
देवी वाचुनी चैन पडेना अंतर भावे झाली रचना , रुप मनोहर गे बाई ॥१॥
पंचामृत स्नान घालूनी हिरवे वस्त्र नेसवूनी , चोळी भरजार गे बाई ॥२॥
पायी पैंजण वाजती बाळ्या बाजुबंद किती मंगळसूत्र हार गे बाई ॥३॥
आठा दिवसां मंगळवारी, आठा दिवसा शुक्रवारी , खडीसाखर कापुर आरती घाली , करु जयजयकार गे बाई ॥४॥
आईचा घालु गोंधळ हरिनाम वाजे सबळ । करु जयजयकार गे बाई ॥५॥
शंख चक्र गदा हातीं सिंहावरी स्वार होतो । चुकुवू येरझारे गे बाई ॥६॥
दासी विनविती मला असु दे अंबा माया तुला । करु नमस्कार गे बाई वेडी झाली फार गे ॥७॥