दत्त शिखराचा राजा । त्यासी नमस्कार माझा ।
दत्त शिखरा वरुनी येतो । यात्रा सांभाळुनी नेतो ।
दत्तु पूजावा अखंड । सर्व सोडावे पाखंड ।
दत्त पुजावा नेमाचा । फेरा चुकेल यमाचा ।
दत्त माझे माय बाप । चुकेल चौर्यांशीची खेप ।
दत्त माझे माता पिता । कुळ उद्धारील आता ।
एका जर्नादनी श्री दत्त । भवसागर करील मुक्त ।