द्रौपदी भगिनीवरती प्रीति अखिक का रे कृष्णा अधिक का रे ॥धृ॥
भगिनी तुझी ही सुभद्रा असे । प्रेम अधिक मग तिजवरी कैसे । कधी कारण मग गृह्य जरी असे नंद बालकारे अजी नंद बाल कारे ॥१॥
तुला दाखवी सत्वर येथे बोट कापले म्हणे आमुचे जावूनी वेगे चिंधी मागे । नारदा रे आता नारदा रे ॥२॥
जावूनी वेगे सुभद्रेगृही बोट कापले सांगे तिजई । देई देई चिंधी थोडी लावे विलंब ना गे ॥३॥
जाऊनी वेगे द्रोपदीगृही बोट कापले सांगे तिजई । देई देई चिंधी थोडी लावे विलंब ना गे ॥४॥
ऐकतां क्षणी पदर जरीचा फाडूनी चिंधी बोले आता । जाऊनी वेगे बांधा बोटा सखये भगिनीची ॥५॥
पाहूनी प्रीति द्रौपदीची म्हणे कृष्णा धन्य भगिनीची । जैसी भक्ति तैसी प्रीति , तुझी रे प्रीति प्रभो तुझी रे ॥६॥