एके दिवसी सहज ब्रह्माऋषी आले फिरत वैकुंठासी
पुसे लक्ष्मी पार्वती पुसेलासी काय देखील नवलासी
दृष्ट झाली रे झाली दत्तात्रया ओवाळुनी ही काया
लिंब लोण मी उतरीले सदया ओवाळुन ही काया ॥धृ॥१॥
मग अत्रीच्या आश्रमी जाऊनी तिथे नग्न भोजन
सतीला मागे मग परिव्रता आठवी पतीच्या पाया ॥२॥
तिर्थ संचर करिता बाळे झाले स्तन पान करु लागले
मग पाळण्यात घालुनी गाणे गाया ॥३॥
जाई जुई गुलाब शेवंती भक्त सुमने घेऊन हाती
दृष्ट काढिती माता अनुसया ॥
ओवाळुन ही काया ॥४॥