मज उद्धरिले रघुराया तव चरण रजाने झाली पावन काया मज उद्धरिले रघुराया ॥धृ॥
कामांध पुरंदर होवोनी आश्रमी येई , पती रुपी धरुनी त्या समयी मज परिव्रत धनासी लुटुनिया घेई मज कपट कळेना काही इतक्यात कांत मम आला तात्काळ शाप मज वदिला पापिणी होय जड शिळा मुनी शापे शचुवर होय भयांकित काया ॥१॥
पदकमल लववुनी भाळ देखुनी डोळा - उ:शाप वदे त्या वेळा - रघुवीर करील उद्धार होसी जड शिळा परी पाहशील घननीळा -मुनी शाप गोड बहु झाला -आज धन्य सुदीन हा आला -तुज देखिले घननीळा तव चरण रजाने झाली पावन काया ॥२॥
सनकादिक तुजला घ्याती परम पवित्रा नमिते तुज पशुपती मित्रा - तव महिमा न कळे निगमा स्वरुप स्वतंत- नमिते तुज दशरथपुत्रा न कळशी शाप पुराणा-श्रुती म्हणती न कळे आम्हा शेष तो होय दीनवाणा - मती हीनदीन मी तुजला किती वर्णाया ॥३॥
मुनी मानस रंजन दशरथनंदन रामा त्रिपुरारी ध्यातो तव नामा - मम पातक का हे गुणग्रामा वैकुंठवासी सुख सुखधामा , निज ज्ञाती कळले मुनी येवूनी वंदी घननीळा , ऋषीसचित पुजुनी रामाला, निज आश्रमी घेऊनी गेले संगे जाया , मज उद्धरिले रघुराया ॥४॥