पंढरीच्या विटेवरी हरी उभा राहिला ॥धृ॥
कर ठेवू कटेवरी उभा भीमीकेच्या तिरी ऎसा पुत्र तुझा नारी कंस मामा मारीला ॥१॥
गोकूळासी केली चोरी बोलविल्या व्रजनारी बसविली द्वारीकापुरी राधे घरी राहीला ॥२॥
अर्जुनाने पण केला साक्षी नारायण दिला आंगुठी टीळा केला तुरा कैसा खोविला ॥३॥
राम म्हणे केशवराया केला निश्चय चल जिवाचा दिनानाथबंधु तुझ्या चरणी माथा ठेविला ॥४॥