मंगळसुत्र कुंकु काजळ पाठविले गुरुंनी ग मजला पाठविले गुरुनी
आहेत पण वाढावे म्हणुनी दिले आशीर्वचन ग मजला दिले आशीर्वचन ॥धृ॥
अष्टभाव हे खडे कोंदणे मंगळसुत्रासी ग बाई मंगळसुत्राशी ,
नवविद्या भक्ति सात्विक रंग दिले कुंकुवासी ग बाई ॥१॥
ईडा पिंगळा नथ नथनीचा आत्मबिंब गाभा ग बाई आत्मबिंब
गाभाकाय मी सांगु आज गडे ग अलंकार शोभा ॥२॥
अद्वैत रती रेखांचे पैंजण वाजतात, पायी ग बाई
ऎसा सदगुरु सहजानंदे त्रिभुवनात नाही ग बाई ॥३॥