एकनाथ घरी पाणी वाहिले । स्वानंर्थाचेस तरंग धुतिले । रामनामास्तव मुखी स्मरावा सुरवरानंदबाळा हे सुरवरानंदबाळा । निजमनी धरशी अढी कशाला सुरवरानंदबाळा ॥धृ॥१॥
जनाबाईचे लुगडे धुतले दळीत असता गाणे गायिले । दमाजीस्तव महार बनला सुरवरानंदबाळ ॥२॥
विदुर घरीच्या कण्या भक्षिल्या । नंद ग्रामीच्या धेनू रक्षिल्या प्रल्हादास्तव स्तंभी प्रगटिला सुरवरानंदबाळा ॥३॥
सुदामजीचे पोहे पसाभर । मिटक्या मारुनी खाशी भराभर । सुवर्ण रतन दिले तयाला सुरवरानंदबाळा ॥४॥
राधा मधुवनी लोलपी बनला नीजमन धरशी अढी कशाला ॥५॥