दु:ख हराया संसाराचे ऎसे बोले भगवंता । प्रेमळ हरीची गीता गा रे प्रेमळ हरीची गीता प्रेमळ हरीची गीता गा रे ॥धृ॥१॥
अर्जुन म्हणे श्रीकृष्णाला चरणी ठेवीतो माथा ॥२॥
श्रीकृष्ण म्हणे अर्जूनाला अमृत आहे कथा ॥३॥
अर्जून म्हणे श्रीकृष्णाला धन्य मी झालो आता ॥४॥
श्रीकृष्ण म्हणे अर्जूनाला युद्धासी उठ बा आता ॥५॥