जगदंबा बसली ग सिंहासनी निघाली छबिन्यावरी स्वारी मोरावरी ॥धृ॥
गाय मुखीकरुनी स्नान भांगी लावूनी पान वंदु अंबिकेच्या चरणी बसली जानकी ॥१॥
नगराची मान काठी-दर्शनासाठी गर्दी मोठी झाली छबिन्याला दाटी लहान थोरांची ॥२॥
वनामध्ये पार्वतीने रुप धारिले जानकीचे जिंकू गेले रामचंद्र बसली डोंगरी ॥३॥
अंबिकेसी ओवाळु आरती विनवूनी प्रार्थू, तिजसी मागू तीर्थ प्रसादासी नमन करु या ॥४॥