होऊनिया साव गुरुचे व्हावे किल्लीदार हरीचे ॥धृ॥
ज्ञान किल्ली घेऊनी हाती । सोडा मनाची अहंकृति । विवेक विचार करुनी चित्ती ।
उघडा दशवे द्वार ॥१॥
त्रिकुटाची वाट नीट । फोडा ब्रह्मांडाचा घाट । सहज घाट और पीट । लुटा द्रव्य पार ॥२॥
धन्य धन्या गुरुमय । दाखविली आत्मसोय । होऊ उतराई काही लागेना पार ॥३॥
दारिद्रयाचा झाला नाश । पुरविली माझी आस । निजदास धरी कास , ऎसे वारंवार ॥४॥
व्हावे गुरुचे किल्लीदार ।